नवरात्री 2024

#tuljabhavani | Navratri2024 | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर; काय आहे इतिहास?

Published by : Team Lokshahi

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीची मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. अशातच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर, केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातील भाविक दर्शनासाठी तुळजाभवानीच्या दरबारी येत असतात. बालाघाटाच्या डोंगर रांगेत वसलेले हे हेमांडपंती मंदिर असून इतिहास व पुरातत्व दृष्ट्या राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे असून एका प्रवेशद्वाचे नाव राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव आहे. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ अन् गोमुख तीर्थ असून देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली अशी कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत अख्यायिका सांगितली जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी तेहतीस कोटी देवतांनी प्रार्थना केल्यानंतर देवीने अवतार घेऊन महिषासुराचा अंत केल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही आराध्यदेवता असून शिवाजी महाराजांना ही आई भवानीने भवानी तलवार दिल्याचा दावा केला जातो.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. देवीची मुर्ती चल मुर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. शारदीय नवरात्र हा देवीचा सर्वात मोठा उस्तव असून या काळात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल होत असतात. या काळात देवीला विविध अलंकार परिधान करून महापूजा करण्यात येते तसेच प्रत्येक विधीसाठी वेगवेगळे मानकरी आहे. तुळजाभवानी मातेच नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येत.

Navratri Special | सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर रेणुकामातेचे मंदीर आहे, जाणून घ्या रेणूका मातेची "ही" कथा...

Railway Ticket CNF And RLWL Meaning : रेल्वे टिकीटावरील CNF आणि RLWL हे कशासाठी असतं, काय आहे याचा अर्थ? जाणून घ्या...

Ajit pawar | माळेगावातील संस्थेला अजित पवारांच्या वडिलांचे नाव

Navratri Special | भक्त्तांच्या हाकेला धावणारी वरळीची ग्रामदेवता ; काय आहे जरीमरी देवीची अख्यायिका?

Bharti Singh: लाफ्टर क्विन भारती सिंगचा नवरात्रीनिमित्त खास लूक पाहा "हे" फोटो...